अखिलेश शुक्लाला अटक

अखिलेश शुक्लाला अटक

मुंबई : कल्याण येथील अजमेरा सोसायटीतील  शेजाऱ्यांना गुंडामार्फत मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला याच्याविरोधात सोसायटीमधील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेऊन  त्याला  अटक करण्याची मागणी केली. अखेर अखिलेश शुक्लाला पोलिसांनी अटक केली.

पोलिस चौकशीत अखिलेश शुक्ला हा आयएएस अधिकारी असल्याचे सांगून स्थानिक रहिवाशांना धमकावत असल्याचे  समोर आले. शुक्लाच्या खासगी गाडीत अंबर रंगाचा दिवा होता. मात्र, त्याचा हाच रुबाब उतरवत कल्याण खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्लाची खाजगी गाडी जप्त केली. या गाडीमधून अंबर दिवाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.