अखेर प्रतीक्षा संपली! दहावीचा उद्या निकाल

SSC Board Result 2025 date Maharashtra: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) इयत्ता दहावीचा निकाल उद्या, १३ मे २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे. यावर्षी राज्यभरातून १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ज्यात ८.६४ लाख मुले, ७.४७ लाख मुली आणि १९ तृतीयपंथी विद्यार्थी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उद्या (१३ मे) दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर १० दिवसांच्या आत निकाल लागेल, असे म्हटले होते. त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर बोर्डाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदा राज्यातून १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. त्यामुळे शिक्षण मंडळ लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याच्या तयारीत आहे.
बारावीचा निकाल ५ मे २०२४ रोजी लागला. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे पदवी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल. त्याचप्रमाणे, दहावीच्या निकालानंतर लागल्यास अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.
दहावीचा निकाल ऑनलाइन कसा पहाल ?
- mahahsscboard.in
-mahresult.nic.in
- msbshse.co.in
- mh-ssc.ac.in
- sscboardpune.in
या वेबसाइट्सवर निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक (exam roll number) आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यामुळे निकाल पाहताना कोणतीही अडचण येऊ नये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. ही परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.