अजित पवारांचा वसंत मोरेंवर निशाणा , स्वतःला वेगळं दाखवण्याच्या प्रयत्नात कोणी....

अजित पवारांचा वसंत मोरेंवर निशाणा ,  स्वतःला वेगळं दाखवण्याच्या प्रयत्नात कोणी....

पुणे: पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाकरे गटाच्या वसंत मोरेंवर निशाणा साधला. स्वतःला वेगळं दाखवण्याच्या प्रयत्नात कोणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला. आज ते पुण्यात बोलत होते.

स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी घटनेच्या निषेधार्थ स्वारगेट एसटी आगारात आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन तोडफोड केली होती. याच घटनेवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंत मोरेंवर निशाणा साधला.

 ते म्हणाले की, स्वारगेट एसटी आगारात घडलेली घटना हि निश्चितच दुर्दैवी आहे. अशा घटनांना आळा घालण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सरकार करते आहे. याही घटनेचा तपास होत आहे. त्यामुळे पूर्ण तपास होऊन सत्यता पुढे येऊ द्या. एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत असाल तर ते बरोबर नाही. स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्ननात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी करत असेल तर त्याची नुकसान भरपाई पक्ष किंवा त्या कार्यकर्त्याकडून वसूल केली पाहिजे असं कोर्टाने सांगितलं आहे. राग व्यक्त करण्याच्या काही मार्ग असू शकतात. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा अतीउत्साह पाहायला मिळतोय. त्यांच्यावरही कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल.