अरुंधती महाडिक यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान...

अरुंधती महाडिक यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी केलेल्या  महिलांचा सन्मान...
अरुंधती महाडिक यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी केलेल्या  महिलांचा सन्मान...

जागतिक महिला दिनानिमित्त यशस्वी सन्मान २०२४ पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यशस्वी मंचातर्फे आयोजित करण्यात या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पंचवीस महिलांना सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार भागीरथी संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती महाडिक यांच्या हस्ते देण्यात आला.

      या कार्यक्रमात महिलांसाठी लकी ड्रॉ आणि करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. महिलांनी घर संसार सांभाळून आपल्यातील कलागुणांना वाव देणं, आणि त्याचा उपयोग आपल्या समाजासाठी आणि प्रथमता आपल्या कुटुंबासाठी करावा यामधूनच स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकतो.असे मत अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं तसेच त्यांनी यशस्वी मंचाच्या कार्याबद्दल विशेष कौतुक ही केलं.

      यावेळी यशस्वी मंचाचे संस्थापिका स्वप्नाली जगोजे ,मोहिनी वनकुंद्रे , मंजिरी कपडेकर,वैशाली काशीद व आदी महिला उपस्थित होत्या.