आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ "यांनी" घेतली

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ "यांनी" घेतली

आंध्रप्रदेश (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीने बहुमत मिळवलं आहे. टीडीपीने ही निवडणुक प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण आणि भाजपाबरोबरच्या युतीत लढली होती. बहुमत मिळवल्यानंतर या तीन पक्षांच्या युतीने आज राज्यात सरकार स्थापन केलं असून चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नायडू यांच्याबरोबर अभिनेते पवन कल्याण यांनीदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नायडू यांनी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच ते या राज्याचे १३ वे मुख्यमंत्री झाले आहेत. विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळ केसरपल्ली आयटी पार्कमध्ये आज (१२ जून) सकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.