HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

पंचगंगा नदीत सापडला अनोळखी मृतदेह

पंचगंगा नदीत सापडला अनोळखी मृतदेह

कोल्हापूर (प्रतिनिधि) : पंचगंगा नदीपात्रात एका अंदाजे ५० वर्षीय पुरुषाचा अनोळखी मृतदेह सापडल्याची घटना आज उघडकीस आली आहे. नदीपात्रात मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर नागरिकांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवले. तत्काळ महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह बाहेर काढून सीपीआर रुग्णालयात पाठवला.

आज दुपारी साधारणपणे ३ वाजता पंचगंगा नदीत मृतदेह तरंगताना दिसला. घटनास्थळावर जमलेल्या नागरिकांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना माहिती दिली. लगेचच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या रेस्क्यू फोर्सने घटनास्थळी येऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह ओळख पटविण्याचे काम अजून सुरु असून तो अंदाजे ५० वर्ष वयाचा, टी-शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेला पुरुष आहे.मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटलेली नसून, तो सीपीआरच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आलेला आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.