चाटे शिक्षण समूहामध्ये गायत्री थोरात प्रथम

चाटे शिक्षण समूहामध्ये गायत्री थोरात प्रथम

कोल्हापूर प्रतिनिधी : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या एमएचटी -सीईटी परीक्षेत गायत्री नंदकुमार थोरात हिने ९९.९९ पसैटाईल गुण मिळवून चाटे शिक्षण समूहात प्रथम येण्याचा मान मिळविला.

या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या २८ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेटाईलपेक्षा जास्त गुण मिळविले, तर ५१३ विद्यार्थ्यांनी १०० ते ९० या दरम्यान पसेंटाईल मिळवले. कोल्हापूर विभागातील ९९ पर्सेटाईलपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांमध्ये गायत्री थोरात, आयुष शिंदे, सृजन कापसे, नेत्रा करोशे, श्रद्धा पोवार, निशिल नायर, आयुषी तिडके, कार्तिकी चव्हाण, सलोनी अटकिरे, नुपूर खांडकर, कार्तिकेय माने, वैष्णवी जाधव, अदिती लोंढे, ऋषिकेश सुर्वे, निकिता पाटील, सिद्धी चौगुले, योगेश्वरी गोदगे, समीक्षा मगदूम, श्रेया उदगावे, शिवानी करमारे, क्षितिज मदनि, ओंकार लोंढे, सानिका सुतार, हर्षित राठोड, सुदेश कारंडे, प्राजक्ता पाटील, कृष्णा बोबडे, प्रतीक फासले यांचा समावेश आहे.

चाटे समुहाचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे आणि प्रा. गोपीचंद चाटे. कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी त्यांचे अभिनंदेना केले.