आईच बनली हत्यारी: सहा वर्षाच्या मुलाला अ‍ॅसिड देत घेतला जीव

आईच बनली हत्यारी: सहा वर्षाच्या मुलाला अ‍ॅसिड देत घेतला जीव

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : बिहारच्या मोसादपूर गावातून समोर आलेली ही घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी ठरली आहे. एका आईने आपल्या सहा वर्षांच्या मुलाचा अ‍ॅसिड पाजून अमानुषपणे जीव घेतला, हे घटना उघड झाली आहे. आरोपी महिलेने आपल्या प्रेमसंबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून ही कृत्य केल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललन कुंवर या व्यक्तीचा सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी आपल्या मुलासह राहात होती. दोघं मिळून काम करून गुजराण करत होत. पुढे ही महिला हुसैना गावात स्थायिक झाली आणि तिथे तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले.

या संबंधांमध्ये सहा वर्षाचा मुलगा वेळोवेळी अडथळा ठरत असल्याने, आरोपी महिलेने प्रियकराच्या सल्ल्यानुसार आपल्या मुलाला अ‍ॅसिड पाजण्याचा अमानुष निर्णय घेतला. अ‍ॅसिड दिल्यानंतर मुलाची तब्येत अचानक बिघडली. त्याची आजीला  ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.

रिफायनरी पोलीस ठाण्याने घटनेची गंभीर दखल घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून, आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. तिचा प्रियकर सध्या फरार आहे, आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, अनेकांनी या क्रूरतेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.