आस्ताद काळेचं छावा चित्रपटाबद्दल धक्कादायक वक्तव्य ..; म्हणाला...

मुंबई - छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. यामध्ये अभिनेता विकी कौशलने केलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. त्याचबरोबर, छावा चित्रपट पाहण्यासाठी काहींजण तर छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करून चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपटातील सगळ्याचं कलालकारांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचंही प्रेक्षकांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, आता छावा चित्रपटात सूर्या ही भूमिका साकरालेल्या अभिनेत्याने केलेली खळबळजनक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
छावा चित्रपटात अभिनेता आस्ताद काळे याने आपल्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, मी आता खरं बोलणार आहे. छावा वाईट फिल्म आहे. फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी problematic आहे. सर्वतोपरी वाईट आहे. हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं ????????!!!! काय पुरावे आहेत याचे ????!!!! औरंगजेबाचे वय आणि आजारपण बघतात तो या वेगाने चालू शकेल? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी? असं नाही व्हायचं हो! सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायेत? आणि ते खातायत? हे कसं चालतं?
अभिनेता आस्ताद काळेने केलेल्या पोस्टमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. काही प्रेक्षक त्याच्या बाजूने त्या पोस्टवर कमेंट करत आहेत तर, काहीजण विरोधात कमेंट करत आहेत.