पंकजा मुंडेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

पंकजा मुंडेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

मुंबई (वृत्तसंथा) : अमेरिकेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या  वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अश्यातच  पंकजा मुंडे यांनीं राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. 

त्या म्हणाल्या , आज राहुल गांधींच्या मनातलं, त्यांच्या पोटातलं ओठात आलं आहे. खरंतर आपल्या देशाची प्रतिमा, देशाबाहेर प्रत्येक पक्षाच्या, विचाराच्या, प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने राखली पाहिजे. पण आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम त्यांनी त्या मुलाखतीत केलं आहे. भारतीय संविधानाचा अवमान त्यांनी करायला नको होता. या बाबतीत त्यांनी खुलासा करायला हवा. त्यांच्या मित्रपक्षांनी त्यांची भूमिका राहुल गांधींशी सहमत आहे का? याबाबत स्पष्ट खुलासा करायला हवा.