एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

हातकणंगले प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठाने बी. कॉम, बीबीए, एमबीए, एम. टेक, सिविल इंजीनियरिंग शाखांसाठी चेन्नई स्थित एल अँड टी एज्यु टेक संस्थेशी सामंजस्य करार केला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मुरली अय्यर, डाटागामी कन्सल्टिंग चे संस्थापक धवल शहा, सीईओ सुरेश कुमार, घोडावत ट्रस्टचे चे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले कुलसचिव डॉ. विवेक कायंदे उपस्थित होते.

     अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा झपाट्याने विविध क्षेत्रात विकास होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दरी दूर करण्यासाठी व विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीसाठी हा करार महत्त्वाचा आहे. स्वतः उद्योग क्षेत्रातील तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्यामुळे नोकरीसाठीची कौशल्ये विकसित होऊन रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. यासाठी हा करार महत्त्वाचा असल्याचे कुलगुरू प्रो.भोसले यांनी सांगितले.

 *विश्वस्त विनायक भोसले* 

      घोडावत शिक्षण संकुलात 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित व्हावीत व रोजगार मिळावा यासाठी सातत्याने विविध संस्थांशी करार करण्यात येतो. चेअरमन संजय घोडावत यांच्या दूरदृष्टीचा हा एक भाग आहे.