कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण

कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते  अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण

कागल - कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नवनियुक्त अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण झाले. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक उपस्थित होत्या. 

एकात्मिक बाल विकास प्रकल्प - कागल अंतर्गत नवीन नियुक्ती झालेल्या नूतन मदतनीसा॓ची नावे अशी, अंगणवाडी सेविका : शुभांगी सपकाळे - रा. सुळकूड, निर्मला दळवी - रा. करड्याळ, कोमल भारमल - रा. अवचितवाडी, ऐश्वर्या पाटील - रा. कासारी, प्रियांका साळुंखे -  रा. हसुर खुर्द, श्वेता कांबळे - रा. मेतगे, रूपाली चौगुले - रा. बेनिक्रे, स्वाती पाटील - रा. करनूर, सोनाली बेलकर -  रा. हळदवडे, रेश्मा चव्हाण - रा. तमनाकवाडा, शितल साठे - रा. बोरवडे.

यावेळी वरिष्ठ सहाय्यक जय सांगडे, मनीषा जाधव, विद्या शेट्टी, अश्विनी आकुर्डे, जयश्री सणगर, अनुराधा दळवी, सुमित्रा कोरवी, जयश्री गवळी, वंदना चव्हाण आदी उपस्थित होते.