HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनचा ५० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनचा ५० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!

कोल्हापूर -  रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या माध्यमातून सातत्यानं सामाजिक कार्यात अग्रेसर राहू, तसंच भविष्यातही विविध लोककल्याणकारी प्रकल्प आणि योजना राबवू, अशी ग्वाही अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी दिली. रोटरी मिडटाउनच्या ५० व्या  वर्धापन दिन आणि सनद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान प्रांतपाल शरद पै यांच्यासह सर्व प्रमुख वक्त्यांनी महाडिक परिवाराच्या वतीनं सुरू असणार्‍या विधायक सामाजिक कार्याची प्रशंसा केली.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन या संस्थेला शनिवारी ५० वर्ष पूर्ण झाली. २९ मार्च १९७५ रोजी, आंतरराष्ट्रीय रोटरी संस्थेनं मिडऊनला मान्यता दिली. त्यामुळे  हा दिवस चार्टर दिन म्हणजे सनद दिन म्हणूनही साजरा केला जातो. संस्थेचा स्थापना आणि सनद दिन, प्रांतपाल शरद पै, पद्मजा पै, खा. धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक होत्या. अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी आपल्या अध्यक्षीय कामगिरीचा आढावा घेतला. भागीरथी संस्थेच्या माध्यमातून गेले १५ वर्षापेक्षा अधिक काळ महिला सक्षमीकरण चळवळीमध्ये काम करत आहे. त्यातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, याची अनुभूती आपल्याला आली. यापुढंही रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी प्रकल्प आणि योजना राबवणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. यावेळी अरुंधती महाडिक यांनी अध्यक्षा म्हणून केलेल्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात आली. तर प्रमुख पाहुणे या नात्यानं बोलताना खा.  धनंजय महाडिक यांनी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या वतीनं सुरू असणार्‍या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. या संस्थेनं केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं त्यांनी आवाहन केलं. 

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी खा. महाडिक यांनी केलेल्या सूचनांबद्दल शरद पै यांनी आभार मानले. तर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या माजी अध्यक्षा आशा नवांगुळ यांनीही अरुंधती महाडिक यांच्या कडून रोटरीच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.  यावेळी रोटरीच्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी रोटरियन गौरी शिरगावकर यांचंही भाषण झालं. कार्यक्रमाला बी एस शिपुकडे, उत्कर्षा पाटील, संग्राम पाटील, अनिरुद्ध तगारे, विकास राऊत, प्रशांत संगवी, करुणाकर नायक, मनीषा चव्हाण, अश्विनी टेंबे, नरसिंह जोशी, चेतन मेहता, सतीशराज जगदाळे, कृष्णराज महाडिक, सौ वैष्णवी महाडिक, सौ अंजली महाडिक, दिलीप कदम, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनचे आजी-माजी सदस्य उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.