कारंजा पोहा रस्त्यावर रिक्षा - पिकअप धडक होऊन तीन जणांचा मृत्यू

कारंजा पोहा रस्त्यावर रिक्षा - पिकअप धडक होऊन तीन जणांचा मृत्यू

वाशिम:  कारंजा पोहा रस्त्यावर तुळजापूर धरणाजवळ मंगळवारी मध्यरात्री ऑटो रिक्षा आणि पिकअप गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर, १२ जण गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता कि यामध्ये दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिकचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहे.

अपघाताची माहिती अशी, कारंजा-पोहा मार्गावर भरधाव वेगात येत असलेल्या पिकअप वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यादरम्यान या रिक्षाच्या मागून आणखी एक रिक्षा आली आणि तिही या पिकअपला येऊन धडकली ऑटो रिक्षामध्ये प्रवासी संख्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने जखमी आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता  आहे.  अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.