के. पी. पाटलांना पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले : आमदार प्रकाश आबीटकर
गारगोटी प्रतिनिधी : राधानगरी मतदारसंघात प्रचंड प्रमाणात केलेली विकास कामे आणि जनतेशी ठेवलेला थेट संपर्क यामुळेच मतदारांच्या उस्फूर्त लाट तयार झाली आहे. त्यामुळे के. पी. पाटलांना पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबीटकर यांनी कुर येथील कोपरा बोलताना केले. जेष्ठ नेते बी. एस. देसाई अध्यक्षस्थानी होते.
आ. आबीटकर पुढे म्हणाले, मतदार संघात मतदार संघ माजी आमदार के पी पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत कोणतीच विकासकामे न केल्यामुळे मतदार संघाची अवस्था भकास झाली होती. जिल्ह्यातील अविकसित असा मतदार संघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात होते. त्यांच्या दहा वर्षातील धुणे धुण्यात दहा वर्षे खर्ची पडली. यावरून त्यांची निष्क्रियता लक्षात येते. महिला भगिनींच्या बरोबर एखाद्या गावातील शिष्टमंडळ निधी मागणीसाठी गेले असता कपाळावर अटी पाडून त्यांना अपमानित करून तुच्छतेची वागणूक दिली जात होती. या सर्व आठवणी आज देखील कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत असुन याचा उद्रेक त्यांचा पराभव करून मतदार संघातील स्वाभिमानी जनता अपमानाचा बदला घेईल. मागील दहा वर्षांमध्ये मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अजूनही बरीचशी कामे मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने करावयाची आहेत. मतदार संघाच्या विकासाच्या ट्रॅकवर आला आहे. पुढील काळात तुम्हा सर्वांच्या साथीने विकासाचा रथ पुढे न्यावयाचा त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे.
युवक नेते मदन देसाई म्हणाले, कार्यकुशल आमदार प्रकाश आबीटकर यांनी मतदारसंघात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवून मतदारसंघात हरित क्रांती केली. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आरोग्य समृद्धी आल्यामुळेच ते पाणीदार आमदार म्हणून शेतकऱ्यांच्यात परिचित असल्याचे सांगून कुर परिसरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. 2014 च्या निवडणुकीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार असून या निवडणुकीत आमदार प्रकाश आबीटकर 50 हजार पेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील.
भाजपचे देवराज बारदेस्कर म्हणाले केपी पाटील हे चिमणी प्रेमी आहेत. त्यांनी जनगण नोकरी लावतो म्हणून सांगितले ते सगळे चिठ्ठीवर रिटायर झालेत.
प्रास्ताविक बि. डी. देसाई यांनी केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील निवासराव देसाई, प्रवीणसिंह सावंत, सुर्याजी देसाई, कल्याणराव निकम, वसंतराव प्रभावळे, धैर्यशील भोसले-सरकार, अशोकराव भांदीगरे, तात्यासो पाटील, अजीत देसाई, प्रवीण नलवडे, विक्रम पाटील, बाबासो जठार आदींसह महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड योग्य ठरली-
प्रकाश आबीटकर या नवतरुणाला २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत उभे केले. 2014 व 2019 साली दोन वेळा आमदारकी भूषवीत मतदार संघाचा कायापालट केला. मतदार संघाच्या इतिहासात कधी नव्हे इतका प्रचंड विकास केला त्यामुळे स्व. लेमनराव निकम, जाधव गुरूजी व मी केलेली निवड सार्थकी लागली असल्याचे ज्येष्ठ नेते बी. एस. देसाई यांनी गौरवोद्गार काढले.