HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

९ एप्रिल पासून कोल्हापुरात आठ दिवसाचा समता महोत्सव सिने अभिनेते किरण माने उदघाटक

९ एप्रिल पासून कोल्हापुरात आठ दिवसाचा समता महोत्सव सिने अभिनेते किरण माने उदघाटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त... निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आणि संविधान जनजागृती अभियान यांच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी रविवार दि. ९ ते १६ एप्रिल या आठ दिवसाचा कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक चळवळींना गतिमान करण्यासाठी प्रबोधनाची भूमिका पार पाडणारा समता महोत्सव आयोजित केला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत कवी, लेखक व प्रकाशक अनिल म्हमाने यांनी दिली.

या समता महोत्सवात आठ दिवस ग्रंथ-चित्र-शिल्प-कविता आणि मुखपृष्ठ प्रदर्शन, प्रबोधनपर व्याख्यान, चर्चा, राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार वितरण, लघुपट (शॉर्ट फिल्म) महोत्सव आणि प्रबोधनात्मक मराठी नाटकाचा प्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत.

समता महोत्सवाचे उदघाटन सिने अभिनेते किरण माने यांच्या हस्ते ९ एप्रिल रोजी दुपारी १:०० वा. होणार असून

सदर कार्यक्रमास माजी आमदार राजीव आवळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजया कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. श्रीकृष्ण अडसूळ, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. अरुण गाडे, लेखिका व प्रकाशिका डॉ. शोभा चाळके उपस्थित राहणार आहेत.

दि. १६ एप्रिल रोजी सायं. ५:०० वा. जगदगुरु विद्रोही संत तुकाराम यांच्या जीवन संघर्षाची वर्तमानातील महत्वाची नाट्यमय कलाकृती खेळ मांडियेला या मराठी वैचारिक नाटकाचा प्रयोग होणार आहे. या वेळी नाटकाचे लेखक व दिग्दर्शक डॉ. सोमनाथ मुटकूळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नंदकुमार गोंधळी, अ‍ॅड. करुणा विमल, सुनील कांबळे, सुहास बोधे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर समता महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन डॉ. नंदकुमार गोंधळी, अ‍ॅड. करुणा विमल यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला प्रा. अमोल महापुरे, नितेश उराडे, धनश्री नझरे, सनी गोंधळी, राहुल काळे, अरहंत मिणचेकर आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.