HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

चार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार - व्ही. बी. पाटील

चार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार - व्ही. बी. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधि) :  कोल्हापूर जिल्हा ग्रामीण आणि कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवाजी स्टेडियम येथील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक व स्वागत शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले - आता विधानसभेचे वेध लागले असून कोल्हापूर जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीकडे असून या तीनही मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील बाराही तालुक्यांचा दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.

 यावेळी कार्याध्यक्ष अनिल घाटगे, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी माने मांगुरकर, सरचिटणीस सुनील देसाई, माजी सरचिटणीस चंद्रकांत वाकळे, रामराजे कुपेकर,श्रीकांत पाटील, निरंजन कदम, हिदायत मणेर, रियाज कागदी, गणेश जाधव, निकिता माने, दिनकर धोंगडे, चंद्रकांत सूर्यवंशी, छाया नलवडे , मंगल कट्टी,  सुमन वाडेकर शशिकांत कदम, संजय शिंदे, धनराज चव्हाण, मोहन कांबळे यांच्यासह तालुक्याचे पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रदर्शन महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले यांनी मांडले. सूत्रसंचालन सेवा दलाचे शहराध्यक्ष महादेव पाटील यांनी केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.