राधानगरी तालुक्यात अपघात; एक ठार , एक जखमी

राधानगरी तालुक्यात अपघात; एक ठार , एक जखमी

राधानगरी तालुक्यात अपघात; एक ठार 

राधानगरी तालूक्यातील तळगाव पैकी भोगूलकरवाडी फाट्यावर आज सकाळी मोटर सायकल आणि इर्टिका गाङी यांच्यात अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून विष्णू दामोदर म्हस्कर वय (65) रा. बावेली तालूका गगणबावडा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर वासूदेव आबा पाटील हे जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राधानगरी तालूक्यातील दूर्गमानवाङ ते तळगाव रोङ वरील फाट्याजवळ झाला.

या बाबत पोलिसांतून मिळालेली माहीती अशी की आज सकाळी विष्णू दामोदर मस्कर आणी वासूदेव आबा पाटील हे दोघेजण हिरो होंडा कंपनीची स्पलेंडर मोटरसायकल क्र. mh-09/ EC 4882 वरून दूर्गमानवङ ते तळगाव रोङवरून कामानिमित्त जात होते. तळगाव पैकी भोगूलकरवाडी फाट्याजवळ मारूती सूझूकी कंपनीची इर्टीका गाडी क्र. mh/09 GE 9213 या गाडीवरील चालकाचा ताबा सूटल्याने ही गाडी या मोटरसायकलला जाऊन धङकली. या अपघातामध्ये विष्णू दामोदर म्हसकर हे गंभीर जखमी झाले होते. प्रसंगी त्यांना राधानगरी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी घेवून जात असतानां त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सोळांकूर येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.. तर त्यांचा जोडीदार वासूदेव आबा पाटील हे जखमी झालेत. या अपघाता प्रकरणी इर्टिका गाडीचालक अभिजित बाबूराव सांगावकर यांच्यावर राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेचा तपास राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात खामकर आणि कृष्णात यादव करत आहेत.