कोल्हापूर क्रीडाईच्या वतीने पूरग्रस्तांना ब्लॅंकेट व ताडपत्री

कोल्हापूर क्रीडाईच्या वतीने पूरग्रस्तांना ब्लॅंकेट व ताडपत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रिडाई कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील शिखर संघटना असून,  नेहमीच निरनिराळ्या सामाजिक उपक्रमात मदत करत असते. याचाच एक भाग म्हणून, कोल्हापूर शहराच्या आसपासच्या परिसरात प्रचंड प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे  पंचगंगा नदीला पूर येऊन पुराचे पाणी कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीत शिरले.  तत्पूर्वी पूरग्रस्त क्षेत्रातील नागरीकांना कोल्हापूर महानगरपालिकेने पूर येण्यापुर्वी सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत केले होते. सामाजिक बांधिलकी म्हणून क्रिडाई कोल्हापूर कडून पूरग्रस्त नागरिकांना  निवारणासाठी ५० ब्लॅंकेंट व ताडपत्री कोल्हापूर महानगरपालिकेडे सुपूर्त करण्यात आल्या. 

तसेच पूरग्रस्त नागरिकांना क्रीडाई तर्फे रविवार, गो ग जाधव शाळा पंचगंगा हॉस्पिटल, डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा सिद्धार्थनगर, शाहू मंदिर सिद्धार्थनगर, जैन बोर्डिंग टाऊन हॉल, मुस्लिम बोर्डिंग दसरा चौक या ठिकाणी सकाळी नाश्ता, दुपारी जेवण,सायंकाळी चहा व रात्री जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी.खोत,सचिव संदीप मिरजकर, सहसचिव गणेश सावंत, सहखजानिस सचिन परांजपे, संचालक विजय माणगावंकर, आदित्य बेडेकर, विश्वजीत जाधव  यांनी स्वतः हजर राहून पूरग्रस्ताना जेवण दिले.