खासदार माने यांच्या हस्ते बुबनाळ येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

खासदार माने यांच्या हस्ते  बुबनाळ येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथे विविध विकासकामांचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, मराठी शाळा चौक ते सुकुमार किनिंगे घर येथील रस्ता अनेक वर्षे निधीच्या प्रतीक्षेत होता. खासदार माने यांनी पुढाकार घेत रस्ते व इतर विकासकामांसाठी निधी मंजूर केला. या निधीतून गावातील काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून खासदार माने यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार माने यांनी मातोश्री पालन योजनेमधून गावासाठी सुमारे 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

        याप्रसंगी सरपंच श्रेणिक मालगावे, उपसरपंच सर्व सदस्य, जवाहर कारखान्याच्या संचालक सुकुमार किनिंगे, शहापुरे सुरेश, जाधव जगन्नाथ, नाभीराज मर्जी, पुंडलिक कवाडे, सुभाष शहापुरे, मकानदार रियाज, मर्जी सुनील, संजय कुंभोजे, आदी उपस्थित होते.