गोकुळच्या सेवासुविधांचा व अनुदानाचा दूध संस्थानी लाभ घ्यावा - चेअरमन अरुण डोंगळे

गोकुळच्या  सेवासुविधांचा व अनुदानाचा दूध संस्थानी लाभ घ्यावा - चेअरमन अरुण डोंगळे

कसबा वाळवे (प्रतिनिधी) :  मुंबई-पुण्यात गोकुळ च्या दुधाला मागणी वाढत असून दूध संस्थांनी गोकुळच्या सर्व सेवा सुविधा आणि अनुदान योजनेचे लाभ दूध उत्पादकांच्या पर्यंत पोहोचवावेत आणि उत्कृष्ट प्रतीच्या दूध संकलनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.  

 अर्जुनवाडा ता. राधानगरी येथे आयोजित राधानगरी तालुक्यातील दूध संस्थां प्रतिनिधींच्या संपर्क मेळाव्यात ते बोलत होते. उपस्थितांचे स्वागत संचालक अभिजीत तायशेटे यांनी केले.

 राधानगरीचा सुपुत्र स्वप्निल कुसाळे यांने ऑलिंपिक पदक जिंकून देशाची शान वाढविल्याबद्दल त्याला गोकुळच्या वतीने एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा डोंगळे यांनी यावेळी संचालक मंडळाच्या वतीने केली.

जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींच्या मागणीप्रमाणे येत्या कुस्ती हंगामा पासून गोकुळ मानधनधारक पैलवान कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणार आहे अशी माहितीही डोंगळे यांनी यावेळी दिली.

     या प्रसंगी पुर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणारे सर्व सुपरवायझर,बिद्री चिलिंग सेंटरवर आयुर्वेदिक बगीचा निर्मिती केलेले अधिकारी विजय कदम ,पुरातून उत्कृष्ट पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉ.जे पी डांगे, तानाजी येरुडकर यांचा गौरव करण्यात आला.

तसेच गोकुळ च्या गाय दूध उत्पादकांना विक्रमी 15 कोटी रुपये अनुदान मिळवून दिल्याबद्दल चेअरमन अरुण डोंगळे यांचा राधानगरी तालुक्यातील दूध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.        

 यावेळी माजी चेअरमन आणि जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी गोकुळ संघना नफा ना तोटा या तत्त्वावर उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य पुरवठा करत असून दूध संस्थांनी गोकुळचेच पशुखाद्य घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

 प्रास्ताविक भाषणात संचालक प्रा. किसन चौगले यांनी गोकुळच्या वाटचालीचा आढावा घेतला. सभेत गोकुळच्या विविध विभाग प्रमुखांनी संस्था प्रतिनिधींच्या समस्या आणि प्रश्नांना उत्तर दिली.

  यावेळी संचालक बाबासाहेब चौगले,शशिकांत पाटील चुयेकर,करणसिंह गायकवाड,रणजित पाटील,बयाजी शेळके,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर,सुभाष जामदार, दूध संकलन आशिष पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ, अधिकारी संस्था प्रतिनिधी संस्था सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सूत्रसंचालन डॉ. एम पी पाटील यांनी केले तर आभार संचालक आर के मोरे यांनी मानले.