HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

विद्यार्थी व पालकांची वारणेच्या कोरे अभियांत्रिकीस पसंती

विद्यार्थी व पालकांची वारणेच्या कोरे अभियांत्रिकीस पसंती

वारणानगर (प्रतिनिधी) : संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय, यांच्याकडून प्रथम वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे रिपोर्टिंग सुरु झाले आहे. ४१ वर्षाच्या १९८३ पासूनची देदिप्यमान कामगिरीची गुणवत्ता राखण्यात तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाने मेन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पस नवे पारगाव येथील प्रथम वर्ष प्रवेशात विद्यार्थ्याची पसंती मिळवुन पालक आणि विद्यार्थ्यांची विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केली होती मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन केमिकल, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, टीसीएस स्पॉन्सर्ड सीएसबीएस, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल शाखेत प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या, ओंकार पाटील, निर्जरा पाटील जाधव, विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभियांत्रिकीचे प्र.प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस एम. पिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी , ऍडमिशन इन्चार्ज डॉ. ए. व्ही. पाटील, जालिंदर जाधव, सूरज खोत विविध विभागाचे विभाग प्रमुख, इतर पदाधिकारी उपस्थित होते.महाविद्यालयास वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मार्गदर्शन व पाठबळ नेहमी मिळत असते.

 डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी म्हणाले की गुणवत्तापूर्ण विद्यार्थी व व दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींना सोबत घेऊन परिपूर्ण व गुणवंत अभियंता तयार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असेन. महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे सरासरी प्रत्येक वर्षी ६५० हून अधिक विद्यार्थ्यांचे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होते.महाविद्यालय दोन वेळा एनबीए, नॅक, मानांकन, नेहमीच गुणवत्ता पूर्ण शिक्षण व दर्जेदार सुविधा, सुसज्ज ग्रंथालय,अत्याधुनिक वसतिगृहे ,दळणवळण सुविधा ,उच्चांकि प्लेसमेंट, बी.टेक ओनर्स कोर्सेस, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार, स्पर्धा परीक्षा केंद्र, इनडोअर स्टेडियम, सेमी ओलंपियाड स्विमिंग पूल, नव्यानेच सुरु झालेले वारणा विज्ञान केंद्र आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरनिराळे कार्यक्रम महाविद्यालयात सातत्याने आयोजित केले जातात असे त्यांनी पुढे सांगितले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.