जोतिबा चैत्र यात्रा निमित्त पार पडली यमाई मंदिर परिसर स्वच्छता मोहीम..!

कोल्हापूर - जोतिबा चैत्र यात्रा जवळ आली आहे प्रतिवर्षी जोतीबा डोंगर परिसराची स्वछता करण्यात येते. याहीवर्षी जिल्हा प्रशासन पंचायत समिती महाराष्ट्र प्रदुषण कार्यालय ग्रामपंचायत देवस्थान समिती यांच्या सहकार्यानी सहजसेवा ट्रस्टच्या पुढाकारातून शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच, हिल रायडर्स, समिट अँडव्हेन्चर, योद्धा अकॅडमी, माऊंटन अँडव्हेन्चर, अँडव्हेन्चर गिअर,व्हरसाईट अँडव्हेन्चर जोतीबा येथिल एस बि ' ग्रुप या संस्थेच्या वतिने हि स्वच्छता मोहीम पार पाडली.
यातील पहिला टप्पा यमाई मंदिर परिसरातील विहिर, मनोहर तळे व तटबंदी यावर खुरटी झुड्पे, झाडे खूप वाढली होती त्यांची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर मंदिर परिसरामधे ही स्वच्छता करण्यात आली. मंदिराच्या बाजूला तलावाच्या शेजारी कचऱ्याचे सामाज्य होते. तेही साफ करण्यात आले..
२००१ साली सहजसेवा ट्रस्ट, हिल रायडर्स, समिट अँडव्हेन्चरच्या वतीने दक्षिण दरवाजा स्वछता मोहिम केली. त्यानंतर अनेक वर्षे स्वच्छता सुरु होती मधल्या काळात हि परंपरा खंडित न करता कै. सुरज ढोली यांनी शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच मार्फत ही परंपरा कायम राखली आज ही परंपरा कायम राखत शंभूराजे च्या छोट्या छोट्या शिष्यानी मोठ्या उत्साहानी सहभाग घेऊन परिश्रम घेतले योद्धा अकॅडमीचे सुभेदार आर. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ६० युवक कार्यरत होते. गिर्यारोहक विनोद कांबोज यांच्या मार्गदर्शना खाली गिर्यारोहनाचा वापर करुन अवघड ठिकाणी स्वच्छता केली. या मध्ये हिल रायडर्स, मांऊटन जिल्हा प्रशासन पंचायत समिती, महाराष्ट्र प्रदुषण कार्यालय, ग्रामपंचायत देवस्थान समिती यांच्या सहकार्यानी सहजसेवा ट्रस्टच्या पुढाकारातून शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच, हिल रायडर्स, समिट अँडव्हेन्चर, योद्धा अकॅडमी, माऊंटन अँडव्हेन्चर, अँडव्हेन्चर गिअर,व्हरसाईट अँडव्हेन्चर जोतीबा येथिल एस बि ' ग्रुप या संस्थेच्या वतिने हि स्वच्छता मोहिम पार पाडली आणि अँडव्हेन्चर गिअरचे गिर्यारोहक काम करत होते.
मुख्य कमानीची स्वच्छता शंभूराजांच्या खेळाडूंनी केली. सहजसेवा ट्रस्टचे विश्वस्त व इतर स्वंयसेवक मोहिमेत सहभागी झाले होते. सचिव शिवराज नाईकवडे, हिल रायर्डसचे प्रमोद पाटील, समिटचे विनोद कांबोज यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम पार पाडली.
तहसिलदार माधवी शिंदे, बिडिओ सोनाली माडकर,व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक सहज सेवाचे सन्मती मिरजे, किरण शहा, अरविंद परमार, सतिश ठक्कर यांच्या सह ग्रामस्थ, निसर्गप्रेमी व विविध संस्थाचे स्वंयसेवक सहभागी झाले होते. ग्रामपंचायत व देवस्थान समीतीचे आधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.