श्री अंबाबाई गरुड मंडपाच्या नुतन काष्ठस्तंभाची उभारणी संपन्न..!

कोल्हापूर - चैत्र कृष्ण व्दितीया या शुभमुहूर्तावर १४ एप्रिल रोजी आपल्या श्री महालक्ष्मी श्री अंबाबाई श्री जगदंबेच्या गरुड मंडपाच्या नुतन काष्ठस्तंभाची उभारणी सकाळी १० वाजता वैदिक मंत्रोच्चारात संपन्न झाली. यावेळी व्दार प्रतिष्ठापना, पूर्णाहूती होम आदी सर्व विधी यथाशास्त्रात पार पडले.
यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा प्रशासक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अमोल येडगे, जिल्हापरिषदेचे सीईओ आर. कार्तिकेयन, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर, पुरोहित विकास जोशी, पंकज दादणे, प्रमोद उपाध्ये उपस्थित होते.