HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बळीराम वराडे तर उपाध्यक्षपदी विनोद कांबोज

ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बळीराम वराडे तर उपाध्यक्षपदी विनोद कांबोज

कोल्हापूर -  ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर (TAAK) ची पदाधिकारी निवड नुकतीच पार पडली. २०२५ पासून पुढील तीन वर्षाच्या कालावधी करिता अध्यक्षपदी बळीराम वराडे (ट्रेड विंग्स लि.) याची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी विनोद कांबोज (समित ऍडव्हेंचर) यांची एकमताने निवड करण्यात आली. 

ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर ही जिल्हास्तरीय ट्रॅव्हल व टूर ऑपरेटर यांची रजिस्टर संस्था असून 2025-2028 या कालावधी करिता पदाधिकारी निवड सर्वानुमते झालेली आहे. सचिव पदी रवींद्र पोतदार (गिरीकन ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेड) सहसचिव पदी इम्रान मुल्ला, खजिनदार पदावर संजय गांधी (गणेश ट्रॅव्हल एजन्सी) सह खजिनदार नवनाथ सुर्वे) तसेच संचालक पदावर अमित चौकले (ट्रॅव्हल लिंक) आणि सचिन सावंत (हर्ष ट्रॅव्हल अँड टूर्स) यांची फेर निवड तर सतीश दळवी, नवनाथ सुर्वे व इम्रान मुल्ला यांची नूतन संचालक पदी निवड झालेली आहे.

बळीराम वराडे हे गेली ४ वर्ष ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरची धुरा सांभाळत आहेत. त्यांचे काम व सर्वांना सोबत घेऊन जाणे, नवनवीन कल्पना,ट्रॅव्हल एजंट यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण अश्या त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना परत एकदा अध्यक्ष पदाची संधी सर्वांनुमते दिली गेली आहे. यासाठी सर्व संचालक मंडळाची सातत्याने मोलाची साथ व सहकार्य मिळाले.नवनिर्वाचित पदाधिकारी याचा लवकरच पदग्रहण समारंभ होईल. या सर्वांना उपस्थित मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. 

ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ही भारतातल्या ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया या असोसिएशनची निगडित आहे. तसेच ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ही कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची सदस्य असून ही कोल्हापूर जिल्हा टुरिझम कमिटी तसेच कोल्हापूर एअरपोर्ट ॲडव्हायझरी कमिटी सदस्य पद भूषवत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.