तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयएसटीइ संशोधन स्पर्धेत यश
वारणानगर (प्रतिनिधी) : पंजाब राज्यातील भटिंडा येथील बाबा फरीद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र राज्य डिझाइन पुरस्कार २०२३ मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मेकॅनिकल विभागातील माजी विद्यार्थिनी मानसी मुळीक हिला सन्मान चिन्ह, रोख बक्षीस आणि प्रमाण पात्र देऊन गौरविण्यात आले. तिला या संशोधनासाठी प्रा. जी. एस. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजीन्नी, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक यांनी अभिनंदन केले.
आयएसटीइ दरवर्षी अभियांत्रिकी शिक्षक आणि पदवीधर विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सर्जनशीलता, नवकल्पना आणि डिझाइन इत्यादी गुणांना वाव देण्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पुरस्कार देत असते. या संशोधन स्पर्धेत येथील तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी मानसी मुळीक हिने 'डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर फॉर मेकॅनिकल अँड इलेकट्रीकल डिझाईन आस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल व्हेईकल' या विषयावरती शोध निबंध सादर केला. तिच्या या शोध निबंधास इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र राज्य डिझाइन पुरस्कार २०२३ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. पुरस्कार वितरण संचालक डॉ. पुनिया यांच्या हस्ते पंजाब राज्यातील भटिंडा येथील बाबा फरीद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात करण्यात आले.