HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खास.धनजंय महाडिकांनी घेतली भेट

अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खास.धनजंय महाडिकांनी घेतली भेट

हातकणंगले (प्रतिनिधी) : अकिवाट - बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर, महापूराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि दोघांचा मृत्यू झाला. तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अजुनही बेपत्ता आहेत. त्या दुर्दैवी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची मंगळवारी खासदार धनजंय महाडिक यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान २०१९ च्या पूराप्रमाणे यंदाही पूरग्रस्तांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. अशावेळी महाडिक परिवार आणि शासन आपल्या पाठिशी असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

 या दुर्घटनेतून बचावलेले रामदास माने, सागर माने, अरूण कांबळे यांची खासदार महाडिक यांनी भेट घेतली. तर तिंघाना बुडताना वाचविणार्‍या ओंकार बागडी, आनंदा बागडी यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान अकिवाट - बस्तवाड दरम्यानचा रस्ता रूंद करून, पूराचे पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी रस्त्याखालून पाईपलाईन टाकावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी अपघात स्थळाची पाहणी केली. २०१९ च्या पूराप्रमाणे यंदाही पुरग्रस्तांना शासन स्तरावरून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. 

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, उदय डांगे, अरविंद माने, अबीदीन मुजावर, रोहित तवंदकर, हरिश्चंद्र पाटील, संभाजी भोसले, पोपट पुजारी, आप्पासाहेब म्हैशाळे, भगतसिंग रजपूत, चंद्रकांत कुलकर्णी, संतोष लाटवडे, नंदकुमार निर्मळे, बाळासाहेब उमाजे, रमेशकुमार मिठारे, राजगोंडा पाटील, श्रीधर पवार, संदीप भाटणकर, आण्णासो कागले, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.