डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. जोतीराम फुले, महावीर जयंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराम फुले व भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम येथील पक्ष कार्यालयात झालेले या कार्यक्रमात या तिन्ही महात्म्यांचे प्रतिमा पूजन निरंजन कदम, पद्मजा तिवले, चंद्रकांत सूर्यवंशी, यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रस्तावना सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले. यावेळी देसाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा जोतिबा फुले व भगवान महावीर यांच्या जीवन कार्या विषयी माहिती दिली. शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, आपला देश अनेक महात्म्याच्या योगदानातून निर्माण झाला आहे. त्यातील हे तीन महात्मे त्यांना मी व माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करतो. या कार्यक्रमाचे आभार गणेश जाधव यांनी मानले.
यावेळी जयकुमार शिंदे, रियाज कागदी, सादिक आत्तार, फिरोज सरगुर, मुसाभाई कुलकर्णी, रवी कांबळे, शशिकांत कदम, राजेंद्र पाटील रापम, अरुणा पाटील, सरोजनी जाधव, यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.