खेबवडे येथील माजी सरपंच सुयोग वाडकर आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित ..!

कोल्हापूर - कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व माजी सरपंच सुयोग वाडकर यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुयोग वाडकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार नाम फाऊंडेशनचे विश्वस्त सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सुयोग वाडकर हे गेल्या २० वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहेत.
आदर्श सरपंच पुरस्कार व सरपंच संवाद मेळावा माऊली संकुल सभागृह सावेडी रोड आहील्यानगर येथे संपन्न झाला. यावेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून सरपंच उपस्थितीत होते. यावेळी नाम फौंडेशनचे विश्वस्त सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. खेबवडे ता. करवीर गावातील तरुण नेतृत्व माजी सरपंच सुयोग वाडकर यांच्यासह राज्यातील 25 मान्यवरांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे, सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील, सह सरपंच पदाधिकारी उपस्थित होते.