HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

तळसंदे येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड

तळसंदे येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड

तळसंदे (प्रतिनिधी) - तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये २९ विद्यार्थ्यांची, मदरसन ऑटोमॅटिक' पुणे मध्ये ७ विद्यार्थ्यांची  'रिटजेन इंडिया पुणे' या कंपनीत १३ विद्यार्थ्यांची  आणि 'भारत फोर्ज' कंपनीमध्ये ६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना किमान 2 लाख ते 3 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले आहे. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाच्या सानिका यादव, हर्षदा पाटील, सोनाली मुळीक, समीक्षा वडगावे, कोमल खोत, साक्षी पटेकरी, मनश्री पाटील, अमृता पाटील, वृषाली चव्हाण, रसिका गराडे, सानिका नरुटे, सानिका भोसले, सुचिता खुटाळे, सीझान बारगीर, अक्षय घुंगुरकर, मानस शिंदे, अमन मुजावर, तेजस पवार, कार्तिक पाटील, तनिष्क लोहार, हर्षवर्धन शिंदे, चिराग होनराव, रिद्धेश गायकवाड, जयदीप आळवेकर, प्रशांत सूम्भे, स्वरांजली पवार, साक्षी हांडे, समृद्धी खामकर, समृद्धी सूर्यवंशी यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून श्रावणी पाटील, फिजा ढालाइत, स्नेहल बागणे, आदित्य खंबे-पाटील, केदार माळी यांची तर मेकॅनिकल विभागातून महेश मोहिते, मिलिंद चौगुले, संस्कृती चौगुले, नेत्रा चौगुले, पार्थ पाटील, विवेक जितुरी, प्रणव पाटील, पुष्कराज ऐद, संकेत कदम, प्राची मदने, चंदना मदने या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

विविध कंपनीमार्फत कॉलेजमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. यामधून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना किमान 2 लक्ष ते 3 लक्ष प्रतीवर्ष पॅकेज दिल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर यांनी दिली. निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे डी. वाय. पाटील टेक्निकल  कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर, प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर, पॉलिटेक्निक उपप्रचार्या प्रा. कलिका पाटील, सर्व विभागांचे विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.