'बाप समजावून घेताना' प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान, माता भगिनींना अश्रू अनावर...

'बाप समजावून घेताना' प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान,  माता भगिनींना अश्रू अनावर...

हातकणंगले प्रतिनिधी : परशुराम घोरपडे 

     हातकणंगले येथील किणी गावात आम्ही किणीकर ग्रुपच्यावतीने वसंत हंकारे यांचे 'बाप समजून घेताना' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किणी गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      यावेळी हंकारे यांनी या जगात आई वडिलांच्या पेक्षा जास्त प्रेम आपल्या मुला - मुलीवर कुणी करू शकत नाही, त्यामुळे जीव गेला तर बेहत्तर पण आपल्या बापाला मान खाली घालावी लागेल असे वागू नका, असे आवाहन त्यांनी केले. 

    तसेच सोशल मीडिया मधील ओळखीला बळी पडून ऐन तरुणी अनेक 'चुका 'करून बसतात व त्याचे प्रायश्चित सर्वात जास्त समाज्यात व इतर ठिकाणी बाप नावाच्या व्यक्तीला द्यावे लागते, क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता बुद्धीने व आर्थिकरित्या स्वावलंबी बना यासंदर्भातील विविध क्षेत्रातील उदाहरणे देत, बाप म्हणजे काय हे त्यांनी संवेदनशीलरित्या सांगितले. त्यांच्या या व्याख्यानासाठी आलेल्या अनेक महिला, मुली भावनाविवश झाल्या तर काहींनाअश्रू अनावर झाले.

    यावेळी राष्ट्रीय नेमबाज संजय पाटील दादा, अँड. एन आर पाटील साहेब, उपसरपंच अशोक माळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, आम्ही किणीकर ग्रुप सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.