HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

दाजीपूर अभयारण्य राहणार दोन दिवस बंद

दाजीपूर अभयारण्य राहणार दोन दिवस बंद

राधानगरी प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या दाजीपूर अभयारण्याला ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवसांत पर्यटकांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय वनअधिकारी एस. एस. पवार (वन्यजीव) व वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली.

गव्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य:

दाजीपूर अभयारण्य हे गवा रेडा व इतर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. मात्र, नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी व अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कडक नियम व कारवाईची चेतावणी:

या काळात अभयारण्याच्या सीमेत विनापरवाना प्रवेश, मद्यपान, गाणी वाजवणे, प्लास्टिकचा कचरा करणे किंवा हुल्लडबाजी यांसारखे प्रकार करणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई होणार आहे. वन्यजीव कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.

पर्यटकांनी टाळावे अभयारण्य भेट:

पर्यटनाला बंदी असल्यामुळे पर्यटकांनी या दोन दिवसांत अभयारण्याला भेट देऊ नये, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे. पर्यावरण संरक्षणासाठी आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.