दालमिया भारत शुगर कारखान्यास 3 पुरस्कारांनी सन्मानित

कोतोली - देशातील सहवीज निर्मिती प्रकल्पांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने पुणे येथील शानदार सोहळ्यात दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लि. युनिट आसुर्ले-पोर्ले कारखान्यास विविध तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते, सर्वोत्तम कोजनरेशन प्लांट पुरस्कार (सलग तीन वर्षे), गाळपाच्या बाबतीत सर्वोत्तम अधिग्रहित कारखाना पुरस्कार आणि सर्वोत्तम इन्स्ट्रुमेंट मॅनेजर पुरस्कार असे तीन पुरस्कार कारखान्याचे युनिट हेड . एस. रंगाप्रसाद, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर मनीष अग्रवाल, सुंदर रेड्डी, संभाजी खवरे यांनी स्विकारले.
या पुरस्काराबाबत बोलताना कारखान्याचे युनिट हेड एस. रंगाप्रसाद म्हणाले की, कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी यांचे योगदान आणि ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्यावर दाखवलेला विश्वास यामुळेच कारखान्यास हे पुरस्कार मिळविणे शक्य झाले आहे.
कारखान्यास मिळालेल्या या यशामुळे कारखान्याचे कर्मचारी आणि परिसरात आनंदी व उत्साही वातावरण आहे. पांडुरंग फिरींगे कोतोली