पुरवणी परीक्षेसाठी शाळांमार्फत परीक्षार्थींना प्रवेशपत्र उपलब्ध - राजेश क्षीरसागर

पुरवणी परीक्षेसाठी शाळांमार्फत परीक्षार्थींना प्रवेशपत्र उपलब्ध - राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - पुरवणी परीक्षेसाठी शाळांमार्फत परीक्षार्थींना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. 24 जून पासून सुरू होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी कोल्हापूर विभागीय मंडळात इयत्ता दहावी साठी 2377 आणि बारावी साठी 4822 असे एकूण 7199 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. तर कोकण विभागीय मंडळा अंतर्गत इयत्ता दहावीसाठी 192 आणि बारावी साठी 397 असे 589 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. 

परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अतिविलंब शुल्कासह पुनर्परीक्षार्थींना अर्ज भरता येणार असल्याची माहिती कोल्हापूर व कोकण मंडळ विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. 

सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना जून-जुलै २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर गुरूवार १२ जून रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असे आवाहन शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.