HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

देव दर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला: 13 जणांचा मृत्यू

देव दर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला: 13 जणांचा मृत्यू

बेळगाव : देव दर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला. टेम्पो ट्रॅव्हलरनं ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं तब्बल 13 भाविकांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी तालुक्यातील गुंडेनहल्ली इथ शुक्रवारी पहाटे घडली. या टेम्पो ट्रॅव्हलरमधील भाविक हे सावदट्टी इथं देवाच्या दर्शनाला गेले होते. मात्र देव दर्शनावरुन परत येताना हा भीषण अपघात घडला. अपघातातील मृत भाविक हे शिवमोग्गा इथले रहिवासी आहेत, अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शिवमोग्गा इथले भाविक टेम्पो ट्रॅव्हलरनं सावदट्टी इथं दर्शनाला गेले होते. यावेळी देव दर्शन करुन परत येताना टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचं गुंडेनहल्ली इथं नियंत्रण सुटल्यानं त्यानं ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व मृत भाविक हे शिवमोग्गा इथले रहिवासी आहेत. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास गुंडेनहल्ली क्रॉसजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच ब्याडगी पोलीस ठाण्यातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र यातील 13 भाविकांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.