राजर्षी शाहू अध्यासनातर्फे वर्षभर शाहूकार्याचा जागर - डॉ. जे. के. पवार
कोल्हापूर प्रतिनिधि : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराजांच्या लोकोत्तर कार्याचा आणि विचारांचा जागर करण्याचा निर्धार राजोपाध्येनगर परिसरातील हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजर्षी शाहू अध्यासनाच्या बैठकीत झाला.
अध्यासनाचे संस्थापक प्राचार्य डॉ. जे. के. पवार म्हणाले, "लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा व विचारांचा जागर करण्यासाठी वर्षभरामध्ये विविध अकरा कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. राजर्षी शाहू संबंधित वाङ् मयावर चर्चासत्र, शाळा, महाविद्यालयांमध्ये १५१ व्याख्याने, निबंध स्पर्धा, ऑनलाईन प्रश्नमंजूषा, चित्रफीत बनविण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, राजर्षी शाहू विचार लेखन उपक्रम, काव्यलेखन, राजर्षी शाहूंच्या १६ भाषणांचे एकाचवेळी वाचन याचबरोबर राजर्षी शाहूंविषयी ग्रंथांना "राजर्षी शाहू साहित्य पुरस्कार" आदी उपक्रमांचा समावेश असेल.'
राजर्षी शाहूंची तंत्रज्ञाननीती, विज्ञान राजर्षी शाहूंची प्रशासननीती, राजर्षी शाहूंचे महिला सवलीकरणाविषयीचे विचार व कार्य, राजर्षी शाहूंची कृषी आणि उद्योगनीती
साने गुरुजी वसाहत राजर्षी शाहू अध्यासनातर्फे तयार केलेला लोगो. आदी विषयांवरील पुस्तकांसह राजर्षी शाहूंचे संक्षिप्त चरित्रदर्शन याचेही लेखन व प्रकाशन अध्यासनातर्फे करणार असल्याची माहिती अध्यासत संचालक प्रा. डॉ. दिग्विजय पवार यांनी दिली.
राजर्षी शाहूंच्या जीवनकार्यावर आधारित २०५ ग्रंथ अध्यासनामध्ये आहेत, शाहूप्रेमी आणि अभ्यासकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालिका श्रद्धा पवार यांनी केले.
यावेळी मंत्रालयीन कक्ष अधिकारी राजकुंवर डफळे पवार, प्राचार्य अवधूत पाटोल, प्रा. पंकज शिदि उपस्थित होते. राजत्रों शाहूंच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त अध्यासनातर्फे केलेल्या लोगोचे अनावरणही झाले.