HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

नेर्ली तामगाव रस्ता पूर्वतत सुरू ठेवा अन्यथा, यापुढे आमची भूमिका..; माजी आ. ऋतुराज पाटील

नेर्ली तामगाव रस्ता पूर्वतत सुरू ठेवा अन्यथा, यापुढे आमची भूमिका..;  माजी आ.  ऋतुराज पाटील

कोल्हापूर - नेर्ली तामगाव रस्ता पूर्वतत सुरू ठेवण्याची मागणी, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील आणि माजी आ.  ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत, येत्या 15 तारखेपर्यंत यातून सकारात्मक निर्णय न झाल्यास आमची भूमिका ही सरकार विरोधात असेल असा इशाराही माजी आ.  ऋतुराज पाटील यांनी दिला.

विमानतळाच्या संरक्षणाच्या कारणास्तव उजळाईवाडी नेर्ली तामगाव रस्ता बंद करण्यात आला. मात्र, या रस्त्याला पर्यायी मार्ग होईपर्यंत हा मार्ग बंद करु नये, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील आणि माजी आ. ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर  आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. याबाबत, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक देखील झाली. या बैठकीत माजी आ. ऋतुराज पाटील यांनी नागरिकांच्या वतीने, तीव्र भावना व्यक्त केल्या. नेर्ली तामगाव मार्गाचा वापर उजळाईवाडी आणि कोल्हापूर परिसरातील नागरिक हुपरी आणि एमआयडीसीकडे जाण्यासाठी करीत आहेत. हा मार्ग बंद केल्याने आणि पर्यायी मार्ग नसल्याने हुपरी, तसेच एमआयडीसीकडे जाण्यासाठी दूरच्या अंतरावरुन जावे लागणार आहे. तर तामगावमधील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाकडे येण्यासाठी दुस­ऱ्या मार्गाचा वापर करताना गैरसोय होणार आहे.

विमानतळ परिसर नजीकच्या गावातील पाणंद रस्ते, गाव रस्ते आणि नवे डी.पी. रोड बाबत धोरण ठरवण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने तामगाव, उजळाईवाडी आणि गोकुळ शिरगाव परिसरातील नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे. जिल्हा प्रशासनाने उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत आणि त्याबाबतचा निर्णय मार्गी लागेपर्यंत उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्ता बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा अशी मागणी माजी आ.  ऋतुराज पाटील यांनी बैठकीत केली.

दरम्यान या बैठकीत नेर्ली तामगाव येथील नागरिकांनी देखील तीव्र भावना व्यक्त केल्या. आम्ही जमिनी दिल्या आणि आता जनता गयी भाड मध्ये अशा प्रकारे शासन वागत आहे अशा तीव्र भावना नेर्ली तामगाव नागरिकांनी व्यक्त केल्या. माजी आ. ऋतुराज पाटील यांच्याबरोबर स्थानिक नागरिकांच्या भावना जाणून घेत, पालकमंत्री आबिटकर यांनी 15 मे रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत चर्चा करुन, किमान या मार्गावरून हलकी वाहने सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. मात्र, याबाबत येत्या पंधरा तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास, सरकारच्या विरोधात आमची भूमिका असेल, असा इशाराही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला. 

यावेळी कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणचे संचालक अनिल शिंदे, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे सातापा कांबळे विकास पाटील राजू माने रणजीत पाटील, लक्ष्मण हराळे, विश्वास तरटे, यांच्यासह उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.