HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शाहु मिलच्या जागेत राजर्षी शाहु महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभं करा : आमदार जयश्री जाधव

शाहु मिलच्या जागेत राजर्षी शाहु महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभं  करा : आमदार जयश्री जाधव

शाहु मिलच्या जागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी आज विधान भवनच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केले. 

शाहू मिल येथे छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, यासाठी सातत्याने विधिमंडळामध्ये आवाज उठवला आणि न्याय मिळावा अशी भूमिका अनेकदा सभाग्रहामध्ये मांडली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिली. परंतु अद्याप शासनाने यासाठी ठोस भूमिका घेत नसल्याबद्दल आमदार जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.

यावर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. यानिमित्ताने शाहू मिल मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाच्या कामास सुरुवात करणे, हीच खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना आदरांजली ठरेल असे मत आमदार जाधव यांनी व्यक्त केले.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून शाहू मिलची स्थापना 27 सप्टेंबर 1906 रोजी झाली. देशातील सरकारी मालकिचा हा पहिला उद्योग होता. शाहू मिलने कोल्हापूरच्या उद्योग विश्‍वात भर घातली. कालांतराने 4 फेब्रुवारी 2001 मध्ये मिल बंद पडली. सध्या शाहू मिलची जागा राज्याच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक उभे करण्याची घोषणा तत्कालीन सरकाने डिसेंबर 2012 मध्ये केली होती. मात्र त्याबाबत शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. विधानसभेत लक्षवेधी, तारांकित प्रश्न आणि आंदोलन करूनही शासन शाहू महाराजांच्या स्मारकाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. यावर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. याचा विसर राज्य शासनाला पडलेला आहेच, याची जाणीव आम्ही यापूर्वीच करून दिले आहे. त्याचबरोबर शासन शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहणार असेल तर शाहू मिल मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकास राज्य शासनाने मंजुरी देऊन, भरीव निधीची तरतूद करावी आणि या कामाला तात्काळ सुरुवात करावी अशी विनंती केली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.