पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळेच मराठा समाजाचे नुकसान-समरजितसिंह घाटगे
सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : दीड लाखाहून अधिक मराठा समाजातील नागरिकांनी दाखल्यांची मागणी केली आहे. फक्त दहा हजार जणांना दाखले मिळाले.उर्वरित नागरिक दाखल्यांपासून वंचित राहिले.मराठा समाजाच्या मतांवर निवडून येणाऱ्या पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळेच मराठा समाजाचे नुकसान झाले.अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केली.
सिद्धनेर्ली ता.कागल येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक आनंदा घराळ होते.येथील दलित समाजाकडून दीड लाख रुपयांचा निवडणूक निधी समरजितसिंह घाटगे यांना सुपूर्द करण्यात आला.
घाटगे पुढे म्हणाले,मराठा समाजास दाखले मिळत नसल्यामुळे होणारे नुकसान टाळावे. याकडे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर मराठा महासंघातर्फेआंदोलन करण्यात आले होते.यामध्ये पालकमंत्र्यांनी लक्ष न घातल्यास त्यांच्या घरासमोर उपोषणाचा इशारा दिला होता.मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले.त्यानंतर आम्ही मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचा सेवक म्हणून याबाबतची कैफियत मांडली.त्यांनी आवश्यकता वाटल्यास आपण संबंधितांशी बोलू.पण पात्र नागरिकांना प्रशासनास दाखले द्यावेच लागतील.असा इशारा दिला.पालकमंत्र्यांनी वेळीच लक्ष घातले असते तर ही वेळ आली नसती.शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यापुरता रद्दचा मुश्रीफ यांनी दाखवलेला जीआर फसवा असल्याचा पुनरुचार घाटगे यांनी केला. तसेच सिद्धनेर्लीतील दलित समाजाच्या जमीन प्रकरणात ते केवळ राजकीय स्टंटबाजी करत आहेत.त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी खुशाल चौकशी करावी. दलित बांधवांचा आम्हाला मिळत असलेला पाठिंबा बघून मुश्रीफ याना पोटशूळ सुटला आहे
राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश कुराडे म्हणाले, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी स्वतःच्या कर्तबगार मुलाला बाजूला ठेवून हसन मुश्रीफ यांना आमदार-मंत्री केले. पण त्यांना उतार वयात त्रास दिला. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मंडलिक साहेब यांनी केलेली ही चूक या निवडणुकीत दुरुस्त करण्याची सुवर्णसंधी कागलकरांनी मुश्रीफ यांचा पराभव करून साधावी.
शाहूचे संचालक प्रा.सुनील मगदूम,निवृत्ती देसाई, धनाजी मगदूम,प्रमोद हर्षवर्धन यांनीही मनोगत व्यक्त केले.
राघू हजारे यांनी स्वागत केले. युवराज पाटील यांनी आभार मानले.
मग मोदीसाहेब खोटे बोलत आहेत काय?
बांधकाम कामगार संघटनेचे शिवाजी मगदूम म्हणाले, गतवेळी पालकमंत्र्यांनी कामगारांना दिलेला शब्द पाळला नाही.याची किंमत त्यांना आत्ता मोजावी लागेल. बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण ताकद समरजितराजेंच्या पाठीमागे उभी आहे. त्यामुळे ते निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून रद्दची अधिसूचना फसवी आहे.एकीकडे नरेंद्र मोदी शक्तिपीठ महामार्गामुळे राज्याची प्रगती होणार म्हणत आहेत मग मोदी साहेब खोटे बोलत आहेत असे मुश्किल साहेब यांना म्हणावयाचे आहे का?