प्रियकराकडून प्रेयसीचा खून
मुंबई प्रतिनिधी : वसई पूर्व चिंचपाडा परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्येच्या घटनेत आरती यादव नावाच्या तरुणीची निर्घृणपणे हत्या झाली आहे. आरोपी प्रियकर रोहित यादव याने भररस्त्यात आरतीला लोखंडी पाना डोक्यात घालून मारले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी रोहित यादवला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीमध्ये, हा खून वैयक्तिक वादामुळे झाला असल्याचा संशय आहे. आरती यादवच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.पोलिसांनी प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे.