HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

बावनदीजवळ मालवाहू ट्रकचा अपघात ; दोन जणांचा जागीच मृत्यू

बावनदीजवळ मालवाहू ट्रकचा अपघात ; दोन जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदीजवळ मालवाहू ट्रकच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्ष सुरू आहे. मंत्री भोसले यांनी या महामार्गाची कालच पाहणी केली आहे. अशातच आज शुक्रवारी सकाळी झालेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदीजवळ मालवाहू ट्रकच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. याबाबत नाराजीचा सूर आहे, काल बांधकाम मंत्र्यांकडून रखडलेल्या या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील करण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. तालुक्यातील उक्षीपासून हातखंबापर्यंत रस्त्यांची दुरावस्था झालेली असताना यातच बावनदी स्टॉपजवळ शुक्रवारी दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात घडला. या अपघातात दोघे तरुण जागीच ठार झाले. गोव्यातून मुंबईच्या दिशेने मालवाहतूक ट्रक ( MH 08 HD 8292) जात करत होता. हा ट्रक बावनदी पुलाजवळ आला असता चालक मोहम्मद अफ्तार समशेर अली (वय 22, रा. नागनाथपूर जिल्हा सुलतानपूर) याचे वेगावरील नियंत्रण सुटले.

या मार्गावर भीषण अपघातात दोन तरुण एकाचवेळी ठार झाल्याने ठेकेदार ईगल कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामावर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक केंद्रचे हेड कॉन्स्टेबल नाटेकर यांच्यासह इतर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून दोन तरुणांचा मृतदेह रत्नागिरीत पाठविण्यात आला. अपघातप्रकरणी पुढील कार्यवाही ग्रामीण पोलीस करीत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.