भागीरथी महिला संस्थेच्या पुढाकारातून कागल तालुक्यातील दीडशे बांधकाम कामगारांना प्रापंचिक साहित्याचे वाटप

भागीरथी महिला संस्थेच्या पुढाकारातून कागल तालुक्यातील दीडशे बांधकाम कामगारांना प्रापंचिक साहित्याचे वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी): खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनामार्फत प्रापंचिक साहित्य प्राप्त झाले होते. त्याचे वाटप करताना मनस्वी आनंद झाला आहे. भविष्यातही या कष्टकरी वर्गाला सर्वतोपरी सहकार्य असेल, असे प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी केले. कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

कागल तालुका धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांसाठी प्रापंचिक साहित्य प्राप्त व्हावे, अशी खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांना विनंती केली.  खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा करून, बांधकाम कामगारांसाठी प्रापंचिक साहित्य उपलब्ध केले. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या साहित्याचे वाटप करण्यात आले. बांधकाम कामगारांच्या डिसेंबरपर्यंतच्या नोंदी पूर्ण  आहेत. या कष्टकरी वर्गाला राज्य शासनाकडून प्रापंचिक साहित्याचे वाटप केले आहे. भविष्यातही या कामगारांना आवश्यक मदत केली जाईल, असे  अरूंधती महाडिक यांनी सांगितले. भागीरथी संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत ३३ हजार महिलांचे सक्षमीकरण केले आहे. त्याचा आपणाला निश्‍चितच आनंद होत असल्याचे महाडिक म्हणाल्या. दरम्यान कागल तालुक्यातील ज्या कामगारांची घरं पडली आहेत, अशा बेघरांच्या निवासासाठी कागल तालुका धनंजय महाडिक युवाशक्तीकडून नोंदणी झाली आहे. अशा व्यक्तींना शासनाकडून घरकुल मिळण्यासाठी, खासदार धनंजय महाडिक आणि त्यांचे कुटुंबीय पाठपुरावा करत आहेत, असे भागीरथी संस्थेच्या शुभांगी देसाई यांनी नमुद केले. यावेळी कागल तालुक्यातील सुमारे दिडशे बांधकाम कामगारांना, हजारो रूपयांच्या प्रापंचिक साहित्याचे वितरण अरूंधती महाडिक, प्रकाश गोते, शुभांगी देसाई, बाळासो कांबळे, संदीप गोते यांच्या हस्ते झाले. तर बांधकाम कामगारांनी भागीरथी महिला नागरी सहकारी पतसंस्थेला भेट देवून, ठेवी आणि कर्जांविषयी माहिती घेतली.

यावेळी स्वप्निल पाटील, संदीप गोते, मारूती जाधव, सुनील परबकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.