मंत्री मुश्रीफांच्या अभिनंदनासाठी घराकडे रीघ; अबाल वृद्धांसह महिलांचाही सहभाग मोठा

मंत्री मुश्रीफांच्या अभिनंदनासाठी घराकडे रीघ; अबाल वृद्धांसह महिलांचाही सहभाग मोठा

 कागल (प्रतिनिधी) : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी कागलमधील त्यांच्या घराकडे रीघ सुरू होती. कागल- गडहिंग्लज- उत्तुर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे आबाल- वृद्धांसह महिलांचाही सहभाग मोठा होता.

   

          

मंत्री मुश्रीफ आज सकाळीच साडेसात वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात उतरले. कोल्हापूरहून कागलकडे येत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या कागल आगारासमोर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आज भेटून अभिनंदन केलेल्यांमध्ये माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, श्रीमती प्रविता सालपे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, आजरा पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई, गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. व्ही. पाटील, ए. वाय. पाटील- म्हाकवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, राजेंद्र माने, भीमगोंडा पाटील तसेच विविध संस्था- संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी यांनी भेटून अभिनंदन केले.

              

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही अभिनंदन......

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही निवडणुकीच्या तोंडावरच मंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा दिला होता. संघटनेचे तालुकाध्यक्ष डाॅ. बाळासाहेब पाटील, संभाजीराव यादव, नितेश कोगनोळे, शिवाजी पाटील, आदी पदाधिकाऱ्यांनी एकत्रित भेटून मुश्रीफ यांचे अभिनंदन केले.