HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

महाडमध्ये इमारतीच्या छतावरून पडून 20 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

महाडमध्ये इमारतीच्या छतावरून पडून 20 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

रायगड - महाड शहरातील काकरतळे परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या चार मजली इमारतीच्या छतावरून पडून रिया किशोर चौधरी (वय 20 वर्षे) या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, महाड शहर पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

रिया चौधरी या समर्थ रामदास अपार्टमेंट (उभा मारोती मंदिराजवळ, महाड) येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. 26 जून 2025 रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास त्या बोअरिंगच्या पाण्याचा नळ बंद करण्यासाठी इमारतीच्या छतावर गेल्या होत्या. यावेळी त्यांचा तोल जाऊन त्या थेट डकमध्ये कोसळल्या.

अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अपघातात डोक्यावर गंभीर इजा होऊन झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.

घटनेची माहिती भावेश रमेश मोरे (वय 45, समर्थ रामदास अपार्टमेंट) यांनी पोलिसांना दिली. महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद घेण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.