महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची ठरली ही तारीख

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची ठरली ही तारीख

दिल्ली (वृत्तसंस्था) :   महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अखेर बिगूल आज वाजला आहे, आणि हे राज्यातील राजकीय वातावरणाला महत्त्वाची वळण देणार आहे. आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली  या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली असून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल, तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. महाराष्ट्रात  एकाच टप्यात मतदान पार पडणार आहे 

महत्वाची आकडेवारी

मतदार संख्या: महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार आहेत.

पुरुष मतदार: 4 कोटी 93 लाख

महिला मतदार: 4 कोटी 66 लाख

तरुण मतदार: 1 कोटी 85 हजार, त्यात 20 लाख 93 हजार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

दिव्यांग मतदार: 6 लाख 2 हजार

ज्येष्ठ नागरिक: 12 लाख 5 हजार

मतदानाची सोय- 85 वर्षांवरील मतदारांना घरातून मतदानाची सुविधा मिळणार आहे, आणि मतदान केंद्रांवर रांगेच्या मध्ये खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज प्रक्रिया

अर्ज दाखल करण्याची तारीख:  22 ऑक्टोबरपासून

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 29 ऑक्टोबर

अर्जाची छाननी: 30 ऑक्टोबर

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 नोव्हेंबर

त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग येणार असून, महाराष्ट्रात कोणत्या पक्षाच सरकार येणार याकडे सर्वांचेच लक्ष यापुढे राहणार आहे.