HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

माजी सैनिकांनी देशासाठी दिलेले योगदान वंदनीय - आ. ऋतुराज पाटील

माजी सैनिकांनी देशासाठी दिलेले योगदान वंदनीय - आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी सैनिक आणि ऑफिसर्स यांनी देशासाठी दिलेले योगदान वंदनीय आहे. याबद्दल आम्ही कायम आपल्या ऋणात राहू. येथून पुढील काळात आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने कार्यरत राहू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

"डीवायपी पॉली ग्रीन ब्रिगेड" यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्याहस्ते आर्मड फोर्सेस ऑफिसर्स आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील बोलत होते. 

यावेळी माजी सैनिकांनी देशसेवेत असतानाचे आपले रोमांचक अनुभव सांगितले. यावेळी रवींद्र पंडित यांनी देशभक्तीपर गीत सादर करून चैतन्य निर्माण केले.

 

यावेळी कर्नल विलास सुळकुडे, मुरलीधर देसाई सर,हवालदार संजय माने,हवालदार विजय पाटील, हवालदार बसगोंडा पाटील,हवालदार नारायण पाटील, सुभेदार संजय खोत,सुभेदार अशोक माळी,मारुती पाटील,रविकुमार चव्हाण यांच्यासह माजी सैनिक तसेच डी .डी.पाटील उपस्थित होते. 

डी. वाय. पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय कुलकर्णी, समीक्षा पारखे, समृद्धी मेटील,वैष्णवी पार्टे यांच्यासह ग्रीन ब्रिगेडच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

*हाक दिली की हजर राहणारा आमदार*

यावेळी बोलताना सुभेदार अशोक माळी म्हणाले,आमदार ऋतुराज पाटील हे हाक दिली की कामासाठी हजर असे आमदार आहेत .पुराच्या काळात आम्ही त्यांना संपर्क केला , त्यावर तातडीने त्यांनी आमच्या भागास भेट देऊन सहकार्य केले. माजी सैनिकांच्यासाठी सुद्धा ते निश्चित तत्पर राहतील.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.