HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मेरीट स्कॉलरशिप मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

मेरीट स्कॉलरशिप मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील असा विश्वास डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील (आईसाहेब )यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी १८८ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिप’ देऊन गौरविण्यात आले.

हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सौ.शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, विश्वस्त वैजयंती संजय पाटील, स्कॉलरशिप समिती अध्यक्ष ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतुराज पाटील यांनी केले. ऋतुराज पाटील म्हणाले, नातवंडांच्या आयुष्यात आजीचे एक वेगळं स्थान असते. दादा आणि आईसाहेबांना आम्ही नेहमीच दैवत मानतो. दादा सांगतात की माणसात देव बघायला शिका. आम्ही त्यांच्यातच देव पाहिला. शिक्षणाचं महत्व फारसं नसलेल्या काळात आईसाहेबांनी त्यांच्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण मिळेल यासाठी आग्रह धरला. राजकारण सोडून शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय दादांनी घेतला आणि त्याला खंबीर असं पाठबळ आईसाहेबांनी दिलं. वात्सल्याच्या धाग्यातून त्यांनी कुटुंबाला बांधून ठेवलं. हे आमचं घरातील विद्यापीठच आहे. म्हणूनच शिक्षणाविषयी आस्था असलेल्या त्यांच्या दूरद्ष्टीचा विचार करूनच आम्ही ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, आम्हाला घडवण्यात आईचे मोठे योगदान आहे. त्याकाळात आम्हा भावंडाना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा आणि मोठ्या बहिणीला शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्याचा धाडसी निर्णय आईनी घेतला. आईच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने आज आम्ही सर्व भावंडे आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकलो. 

डॉ. पाटील पुढे म्हणाले, २०२३ मध्ये आईसाहेबांच्या जन्मदिनी हि योजना सुरु केली. या योजनेत २०२२-२३ मध्ये ६६ विद्यार्थ्यांना तर २०२३-२४ मध्ये १३६ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. यावर्षी १८८ विद्यार्थ्यांना हि स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली आहे. केवळ गुणवत्ता हाच निकष ठेऊन यामध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी निकोप स्पर्धा व्हावी या हेतूने हि मेरीट स्कॉलरशिप सुरु करण्यात आली आहे. याचा आतिशय चांगला परिणाम विद्यार्थ्यामध्ये दिसून आला आहे. यावर्षीच्या १८८ विद्यार्थ्यांमध्ये तब्बल १५२ नव्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळाली आहे. केवळ ३६ विद्यार्थीच असे आहेत कि ज्यांना यापूर्वीही हि स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे.

  या समारंभात पाटील कुटुंबियांच्यावतीने केक कापून सौ. शांतादेवी डी. पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आई साहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारी चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी स्कॉलरशिपप्राप्त काही विद्यार्थी व पालकांनी उत्स्फुर्तपणे मनोगत व्यक्त करत डी. वाय. पाटील ग्रुपबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्कॉलरशिप समितीच्या सदस्या सीएचआरओ सौ. श्रीलेखा साटम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. मधुगंधा मिठारी व प्रा. रोहिणी तुरंबेकर यांनी केले.

 या समारंभाला भाभा ऍटोमिक रिसर्चचे माजी सहसंचालक प्रा. डॉ. जे.व्ही. याखमी, डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे कार्यकारी संचालक डॉ. भरत पाटील, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. श्वेता पाटील, डी वाय पाटील ग्रुपच्या अॅडव्हायझर सौ.पूजा ऋतुराज पाटील, अॅडव्हायझर सौ.वृषाली पृथ्वीराज पाटील, अजितराव पाटील बेनाडीकर, लोकमतचे संपादक डॉ. वसंत भोसले, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, मेडिकल कॉलेज डीन डॉ. आर के शर्मा, कुलसचिव डॉ व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे. ए. खोत, प्राचार्य डॉ. एस. आर. पावसकर, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. संतोष चेडे, डॉ. महादेव नरके, डॉ. अजित पाटील, डॉ. अमृत कुवर रायजादे, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. सुरेंद्र माने, डॉ. उमाराणी जे., रुधीर बारदेस्कर, डी. एन. शेलार, डॉ. लीतेश मालदे यांच्यासह डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप मधील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.