मोठा धक्का! निलेश राणे आता शिंदेंच्या शिवसेनेत
मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे, ज्यामध्ये मोठी बातमी म्हणजे निलेश राणे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता त्यांनी अधिकृतरित्या जाहीर केलं आहे की, ते बुधवारी दुपारी कुडाळच्या मैदानावर शिंदे गटात सामील होतील. पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा करत पक्षांतराचे कारण आणि आगामी निवडणुकीतील रणनीतीसंबंधी माहिती दिली.