HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राजे रघुजी भोसले यांची तलवार पुन्हा भारतात आणली याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनस्वी अभिनंदन - विजय जाधव

राजे रघुजी भोसले यांची तलवार पुन्हा भारतात आणली याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनस्वी अभिनंदन - विजय जाधव

कोल्हापूर -  नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे. त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे. रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. राजे रघुजी भोसले यांची तलवार पुन्हा भारतात आणली याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनस्वी अभिनंदन भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले. 

रघुजी भोसले यांनी 1745 च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत विकास खारगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ती खरेदी करण्यात आली. यासाठी 47.15 लाख रुपये राज्य सरकार देणार आहे. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. 

एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकारांचा अंदाज आहे. 

राज्य सरकारचा आजचा हा निर्णय म्हणजे तमाम शिवभक्तांसाठी आनंददायी आहे. राज्यातील महापुरुषांच्या स्मृती जपण्याचे कार्य भाजपा सरकारच्या माध्यमातून होत आहे त्याचीच प्रचिती पुन्हा आजच्या निर्णयातून दिसून आली.

महाराष्ट्र राज्याचा ऐतिहासिक वारसा कृतीत उतरून तो जपण्याचे कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत.  

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.