HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राहुल पाटील यांचा विजय निश्चित- डॉ चेतन नरके

राहुल पाटील यांचा विजय निश्चित- डॉ चेतन नरके

कळे (प्रतिनिधी) : स्वर्गीय पी एन पाटील हे करवीर मतदारसंघाच्या विकासाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होते .अरुण नरके व स्वर्गीय पी एन पाटील यांच्या नसानसात निष्ठा ठासून भरलेली होती .त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले.या मतदारसंघात राहुल पाटील व आम्ही हातात हात घालून काम करत असून महाविकास आघाडी चे कार्यकर्ते राहुल पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक डॉ चेतन नरके यांनी केले.

   

कळे जिल्हा परिषद मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती .अडचणीत सापडलेला धामणी प्रकल्प अडचणीतून बाहेर काढून त्याला निधी उपलब्ध करून देण्याचे काम पी एन पाटील यांनी केलेले आहे .राहुल पाटील हे नव्या विचाराचे सुसंस्कृत नेतृत्व असून त्यांना मिळणारा उस्फुर्त पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित आहे .मतदारांनी कोणत्याही भूल थापाना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले .

       यावेळी बोलताना विलास पाटील यांनी स्वर्गीय आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी अवघ्या पाच वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघात विकास काय असतो हे दाखवून दिले .चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे लोकांना केवळ फसवण्याचे काम केलेले आहे .या मतदारसंघाचा विकास करण्याची ताकद केवळ राहुल पाटील यांच्याकडेच असून चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे केवळ भूल थापा लावण्याचे काम केलेले आहे .यावेळी पन्हाळ्यातील जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.त्यामुळे पन्हाळा तालुक्यातून राहुल पाटील यांना निर्णायक व विजयी मताधिक्य देऊ असे सांगितले .

            यावेळी बोलताना करवीर चे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघ भकास केला असून कुंभी कारखाना ही कर्जाच्या खाईत लोटला आहे हेच त्यांचे कर्तृत्व आहे .पी एन पाटील हेच धामणी प्रकल्पाचे खरे खुरे शिल्पकार आहेत .मतदारसंघात गट न बघता त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता उभा केलेले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत राहुल पाटील यांचा विजय निश्चित आहे असे सांगितले .

      यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांनीस्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी अवघ्या पाच वर्षात करवीर मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला असून धामणी प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आगामी काळात हा मतदार संघ राज्यात आदर्श बनवण्यासाठी मी वचनबद्ध असून सर्वांनी भरघोस मताधिक्य देऊन आशीर्वाद द्यावा मी आजन्म आपला सेवक म्हणून कार्यरत राहील असे प्रतिपादन केले .

   यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मोळे, हंबीरराव चौगले शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश पोवार,विलास पाटील कळे, रणजित पाटील,ज्ञानदेव कांबळे काटेभोगाव,यांची भाषणे झाली.

     यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष,संभाजी पाटील(तात्या),गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडेबाळासाहेब मोळे,सुरेश पाटील , एस के पाटील ,पी.डी.पाटील,,सुनील पाटील,माजी सभापती बंकट थोडगे ,रणजित पाटील,शंभूराजे पाटील,शंकर राबाडे,बापू गिरीबुवा,शामराव पाटील,तसेच ए.डी.पाटील),रघुनाथ आवळेकर,,सरदार पाटील,केरबा पाटील,डॉ कोल्हे,अनिल पोवार,संदीप टिक्के,शिवाजी पाटील,कृष्णनाथ कदम,सीताराम सातपुते,,युवराज पाटील(सर),निवास पाटील(सर),सतीश मोळे,बाजीराव पाटील,किरण पाटील, मनोज पाटील,पांडुरंग जाधव यांच्यासह मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मनोज पाटील यांनी मानले

      काटेभोगाव येथील कार्यकर्त्यांचा चंद्रदिप नरके ना रामराम 

    काटेभोगाव येथील नरके गटाचे कार्यकर्ते ज्ञानदेव कांबळे प्रणिता कांबळे, बाजीराव कांबळे, धिरज आंग्रे, शशीकांत कांबळे, श्रीकांत कांबळे, गजानन कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नरके गटाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे नरके गटाला मोठा धक्का बसला आहे 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.